आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलने:यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलने

मारेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी, गॅस सिलिंडरला हार घालून इंधन दरवाढीचा निषेध

मारेगाव केंद्रातील भाजप सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल, डिझेल, गॅस, तेलाचे भाव वाढवून गगनाला भिडवले आहे. या सरकारला जनतेचे काही घेणे देणे नसून खोटे बोलून सत्ता हस्तगत करणे, केवळ हाच उद्देश भाजप सरकारचा असल्याचा आरोपही तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेस कमिटीने केला आहे. केंद्र सरकारने त्वरित जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे, न केल्यास काँग्रेस कमिटीच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणा खंडाळकर, ज्येष्ठ नेते शकील अहेमद शकील कुरेशी, बाजार समितीचे उपसभापती वसंतराव आसुटकर, रमण डोये, मारोती गौरकार, शंकरराव मडावी, उदय रायपुरे, तुळशीराम कुमरे, प्रफुल्ल विखणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रायुकाँतर्फे आश्वासनांचा केक कापून ‘एप्रिल फुल’ आंदोलन
महागाव
महागाई, बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारचा महागाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाव तालुक्यातील धनोडा व काळी दौलत येथील पेट्रोल पंपावर महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा केक कापून आंदोलन करण्यात आले. तसेच महागाई विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. आंदोलन राष्ट्रवादी युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस दीपक धात्रक व जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर करण्यात आले.

यावेळी धनोडा येथील आंदोलनात राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड, राष्ट्रवादी युवानेते राम जाधव, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अबीद खान, सोहेल चव्हाण, तालुका सरचिटणीस गजानन जामकर, प्रफुल्ल खंदारे, तालुका उपाध्यक्ष अरविंद पवार, संजय चोरमले, गणेश जाधव, अमित जाधव, गोपाल जाधव, नवीन राठोड, पंकज पवार, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

घोषणाबाजी देत दिग्रस तहसील परिसरामध्ये धरणे आंदोलन
दिग्रस
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस , खाद्य तेल, अन्नधान्य व भाजीपाल्यामध्ये केलेल्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाल्याने सामान्य माणसांना जगणे मुश्किल झाल्याने काँग्रेस पक्षाचे राज्यामध्ये महागाई विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा काँग्रेसतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

दिग्रस काँग्रेस पक्षातर्फे तहसिल आवारात गुरुवारी १ एप्रिलला सकाळी ११ वाजता केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला असून महागाई परत घ्या असे घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यामध्ये शंकर जाधव, अरबाज धारिवाला, भारत देशमुख, राजेंद्रसिंह चौहान, सलीम पटेल, सोहेल शेख, इफ्तेखार खान, गणेश रोकडे, बबन इंगोले, नारायण राठोड, कामील, मोहम्मद, इस्माईल, प्रल्हाद भगत, ज्ञानेश्वर पटेल, रब्बू, विजय गुघाणे, राहुल वानखडे, विश्वभंर चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...