आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:दिग्रस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका आढावा बैठक; जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांची उपस्थिती

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी पक्षाचे धेय्य व धोरण यासाठी दिग्रस येथे राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठक राज्य समन्वयक सुहास उभे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी निरीक्षक अशोक परळीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर उपस्थित होते.

यावेळी सुहास उभे, अशोक परळीकर यांनी पक्ष मजबुतीकडे लक्ष द्यावे, जनसामान्यांना आपल्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशा विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.

राष्ट्रवादी पक्षाकडून आलेल्या मान्यवरांचा दिग्रस राष्ट्रवादीतर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दिग्रस राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सलीम खान, भारत पाटील सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...