आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस शहरातील मुख्य चौक असलेल्या मानोरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकर टॉकीज, आर्णी नाका, जुना पेट्रोल पंप आदी चौकात प्रवाशांना वाहनांची वाट बघत ताटकळत उभे राहावे. उन्हाळा, पावसाळ्यात प्रवाशांना या चौकात असलेल्या दुकानाचा आसरा घेऊन उभे राहावे लागते. काही चौकात तर प्रवाशांना दुकानापुढे वाहनांची वाट बघत असतांना दुकानदारांना ग्राहकाची अडचण येत असल्याने प्रवाशांना दुकानाबाजूला उभे राहण्यासाठी हटकले जाते. त्यामुळे हक्काचे वाहनांची वाट बघण्यासाठी प्रवाशी निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. एकीकडे प्रवाशी निवारा नाही तर दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे या सर्व चौकात शौचालय व स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशी नागरिकांसह महिलांची कुचंबणा होतांना स्पष्ट दिसते अशा गंभीर मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधीने लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. दिग्रस शहरातील चौकात दारव्हा, नागपूर,यवतमाळ, आर्णी,अकोला, नांदेड, मानोरा, पुसद कडे जाणाऱ्या प्रवाशाची गर्दी असते. ही गर्दी शहरातील मुख्य चौकातील दुकानापुढे असते. प्रवाशी नागरिक,महिला , मुले व वृद्धासह तरुण - तरुणी वाहनांची कुठेही उभे राहून वाट बघत असतात त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. वाहनांची वाट बघण्यासाठी प्रवाशी निवारा उपलब्ध करून दिला तर प्रवाशाची गैरसोय दूर होऊ शकते. परंतु याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने प्रवाशांना वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट दिसते. यावेळी महिलांना शौचालय किंवा लघुशंकेला जायचे असल्यास कुठलीही सुविधा चौकात नसल्याने हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा लोकप्रतिनिधी यांनी या समस्येला गांभीर्याने घेऊन ही मूलभूत समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.
जनप्रतिनिधीचे दुर्लक्ष का ? दिग्रस शहरातील बसस्थानक हे दिग्रस दारव्हा रस्त्यावर असल्याने एका बाजूला झाल्याने शहराचा विस्तार दुसऱ्या भागाने वाढलेला आहे. त्यामुळे या एसटी बसमधून येणारी बस ही दिग्रस मुख्य चौकातूनच येते त्यामुळे मानोरा चौक, शिवाजी चौक, शंकर टॉकीज चौक, जुना पेट्रोल पंप व आर्णी नाका या चौकात प्रवासी वाहनांची वाट बघत उभे राहतात. दिग्रस शहरातील या मुख्य चौकात शौचालय, मुत्रीघर व प्रवासी निवारा आवश्यक असतांना अशा बाबीकडे जन प्रतिनिधीचे दुर्लक्ष का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.