आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरूड जहांगीर येथे‎ जनावरांना लम्पीची लागण‎:‘पशुसंवर्धन’ने लसीकरण शिबिर घेण्याची गरज‎

राळेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वरूड जहांगीर येथे गेल्या काही दिवसांपासून‎ जनावरांच्या शरीरावर गाठी येण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा‎ गाठी येण्याचा प्रकार म्हणजे लम्पी आजार असल्याची भीती‎शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.‎अगोदर अतिवृष्टीमुळे पिकाची टक्केवारी‎कमी, त्यातल्या त्यात शेतमालाला‎समाधानकारक भाव नाही त्यामुळे शेतकरी‎अगोदरच द्धिद्धामनस्थितीत आणि अशातच‎शेतकऱ्यांच्या जनावरांना अशा रोगाची लक्षणे‎लागल्यामुळे अशा प्रकारे अनेक जनावरांना‎ लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करीता अगोदरच‎ या गावात जनावरांना प्रतिबंधात्मक लस टोचून जनावरांना या‎ रोगापासून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी वसंत जिनिंगचे‎ संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य रामधन राठोड, खरेदी‎ विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते, ग्राम पंचायत सदस्य‎ भानुदास चव्हाण, ग्राम पंचायत सदस्या ज्योत्स्ना उईके, गजानन‎ ठाकरे, पुंडलिक आत्राम,पुनेश्वर उईके, किरण निमट, दशरथ‎ भोरे, प्रविण भोरे, राहूल भोरे, सदानंद भोरे, जनार्धन कडू,‎ प्रशांत भोरे, शंकर मेश्राम, उत्तम मेश्राम, विजय खैरे, इत्यादी‎ शेतकऱ्यांनी केली आहे.‎