आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरगड शिवारातील आढळला होता मृतदेह:प्रेम प्रकरणातून नितूची हत्या, आरिफ फरारच

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासुन काही अंतरावर घाटंजी मार्गावर असलेल्या सावरगड शिवारात असलेल्या शेख लुकमान यांच्या शेतामध्ये नितु बंडुजी सावध या २५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सोमवार, दि. १२ सप्टेंबरला ग्रामीण पोलिस ठाण्यात आरिफ नामक व्यक्तीवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशीपासून आरिफ फरारच असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. हिंगणघाट येथील २५ वर्षी तरुणी नितु सावध दोन वर्षापासून यवतमाळात येथे राहून पोलिस भरतीची तयारी करीत होती. इंदिरा नगर भोसा पोलिस भरती सराव प्रशिक्षण केंद्रात तीचा सराव सुरू होता. ती यवतमाळ येथील अवधूतवाडी परिसरात किरायाने रूम करून पोलिस भरतीची तयारी करीत होती.सावरगड शिवारात असलेल्या शेख लुकमान यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नितु सावध हीचा मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा सर्व बाजुंनी विचार करुन पोलिसांनी तपास सुरू केला होता.

बातम्या आणखी आहेत...