आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:इंडियन मेडिकल असोसिएशनचा नवीन पदग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी डॉ. संजय रत्नपारखी तर सचिवपदी डॉ. शरद राखुंडे

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आयएमए हॉल लोहारा येथे पार पडला. यामध्ये अध्यक्ष म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय रत्नपारखी तर सचिव त्वचारोग तज्ञ डॉ. शरद राखुंडे यांनी शपथ घेतली. यावेळी आयएमए एएमएसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कसारे व सचिव डॉ. स्नेहा राठोड महिला विंगच्या अध्यक्ष डॉ. सारिका शाह व सचिव डॉ. नेहा मुंदडा यांचाही शपथविधी पार पडला.

या समारंभामध्ये इंस्टॉलींग ऑफिसर म्हणून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य नागपूर येथील डॉ. अनिल लद्धड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी तर नागपूरचे प्रसिद्ध डॉ. उदय बोधनकर हे होते. आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. उमेश रेवणवार तसेच आयएमएचे सेंट्रल कमिटी सदस्य डॉ. टी.सी. राठोड हे उपस्थित होते. मागील दोन वर्षे हे सर्वांनाच अतिशय खडतर गेले असून सर्वांनी मिळून कोरोना महामारीच्या संकटाला सर्वांनी धैर्याने सामना करून विजय मिळवला आहे, असे प्रतिपादन मावळते अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांनी केले.

पूर्व सचिव डॉ. प्रशांत कसारे यांनी मागील कार्य काळाचा अहवाल सादर करून विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मागील दोन वर्षात शहरातील काही व्यक्तींनी समजोपयोगी उपक्रमांसाठी आयएमएला मदत केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मिलिंद कांबळे, ललितकुमार वऱ्हाडे, कुणाल झाल्टे, तहसीलदार, डॉ. विजय अग्रवाल, डॉ. गिरीश जतकर, प्रा. घनश्याम दरणे, अजय मुंदडा, राजेश्वर निवल, यवतमाळ आपत्कालीन समिती, शिवसमर्थ ढोल पथक, वसंत बहुउद्देशीय संस्था, दिलीप हिंडोचा, रोटरी मिडटाऊन, एनआयएमए अध्यक्ष डॉ. प्रवीण राखुंडे आणि सहकारी, इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ. रेखा कसारे, डॉ. अमृता शेंडगे, डॉ. ज्ञानेश्वर पुनसे आणि सहकारी. पद्मजा गणेश इंगळे, कौस्तुभ मेडिकेयर, मेडिकेयर अँड गॅसेस, ऑक्सीलाईफ गॅस कंपनी यांचा समावेश होता.

नवीन कार्यकारी मंडळामध्ये उपाध्यक्ष डॉ. आशिष तावडे, डॉ. स्नेहा भुयार, डॉ. जयवंत महादणी, डॉ. अपर्णा बाहेती, डॉ. रवी साबू, डॉ. हेमंत म्हात्रे, डॉ. अमर सुरजुशे, सहसचिव डॉ. चेतन राठोड, डॉ. स्वप्नील मदनकर, सेंट्रल रिप्रेझेंटेटिव्ह डॉ. विजय कावलकर, स्टेट कॉर्डिनेटर डॉ. अशोक चौधरी, स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह डॉ. दिपक सव्वालाखे, मेडीकल स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह डॉ. अमोल देशपांडे, चेअरमन डॉ. सुबोध पुरोहित, कल्चरल कमिटी सेक्रेटरी डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. विकास येडशीकर, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्राची उजवणे, मेडिको लीगल कमिटी डॉ. सुनील अग्रवाल, डॉ. परेश गंडेचा, डॉ. गिरीश माने, पब्लिक व सोशिअल मेडिया अवरेनेस कमिटी डॉ. स्वप्नील मानकर, को ऑप्ट मेंबर्स डॉ. अरविंद लाल, डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ. राजू गोरे, डॉ. रुपेश बावणे, डॉ. मुजम्मिल कोशिश, सोशल सिक्युरिटी स्कीम डॉ. गौरव पटेल, पीआरओ डॉ. प्रशांत पवार, डॉ. हर्षल राठोड, मॅग्मो रिप्रेझेंटेटिव्ह डॉ. विजय आकोलकर, वुमेन्स विंग डॉ. स्वाती पाटील, डॉ. प्राची चक्करवार, अॅडव्हायजरी कमिटी डॉ. टी. सी. राठोड, डॉ. अजित फडके, डॉ सुरेंद्र मुंदडा, डॉ. सुरेखा ठाकरे, डॉ. विद्या चौधरी डॉ. विजया कावलकर, डॉ. एन. के. पुराणीक यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...