आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवचैतन्य:मंगलमूर्तीच्या निर्बंधमुक्त आगमनाने बाजारपेठेत नवचैतन्य

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश कटांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवार, दि. ३१ ऑगस्टला गणपती बाप्पा विराजमान होत आहे. अवघा जिल्हा बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर अमरावती परि क्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील संवेदनशील तालुक्यात भेटी देत आढावा घेतला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या श्री गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री गणेश भक्तांना जल्लोष करता आला नव्हता. परंतु आता कोरोना काळा संपल्याने यावर्षी शहरातील मोठे मंडळे आपल्या लाडक्या श्री गणेशाच्या भव्य मूर्तीला घेऊन मंडळात स्थापित करण्यासाठी तयारीला लागले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडळांनी यंदाही आवरते घेतले आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत सोमवारपासूनच गणेशमुर्तीसह साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. या उत्सवानिमित्ताने बाजारपेठेत चैतन्याचा ही श्रीगणेशा होईल असे आशादायी चित्र आहे. या पार्श्वभुमीवर मंगळवारी सकाळी अमरावती परि क्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी पुसद, दारव्हा, दिग्रस तालुक्याचा आढावा घेत योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर उमरखेड येथे भेट देवून संवेदनशील भागाची पाहणी केली.

दरवर्षीपेक्षा तिप्पट गर्दी
आपल्या भागात गणेशोत्सवात वाहन खरेदीचा एवढा जास्त ट्रेंड नाही. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे व्यवसायांवर आलेली मंदी आता हळुहळु दुर होताना दिसत आहे.त्याचाच परिणाम होवुन यंदाच्या गणेशोत्सवात तिप्पट गर्दी वाहन खरेदीसाठी होताना दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मंदी दुर होइल अशी आशा आहे. - राजेश्वर नीवल, संचालक, पार्वती हिरो शोरुम

परजिल्ह्यातून मागितला पोलिस बंदोबस्त
जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, दारव्हा, नेर आणि महागाव या संवेदनशील तालुक्यावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे नाशिक, वर्धा, वाशीम आणि गोंदिया येथून बंदोबस्त बोलावण्यात आला आहे.

मातीच्याच मूर्तींना घरी नेण्यास पसंती
पर्यावरण गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. विविध माध्यमातून याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आले होते. याचमुळे यंदाही नागरिकांनी मातीच्याच गणेशमूर्तीना आपल्या घरी नेण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र बघावयास मिळाले.

बातम्या आणखी आहेत...