आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:निंबी ते पार्डी खड्डेमय रस्ता, अपघाताला सस्ता; जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसदचे दुर्लक्ष

पुसद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद अंतर्गत येत असलेल्या निंबी ते पार्ङी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी या रस्त्याची परिस्थिती झाली आहे.दोन महिने अगोदर पाचशे मीटर रोडची दुरुस्ती न करता तीन लाख रुपये निधी हडप केला आहे.रस्त्याची दुरुस्ती न करता तीन लाख रुपयाचा निधी कागदपत्रे ठेकेदार यांनी हडप केला आहे.

मागील दहा वर्षा अगोदर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले तेव्हापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही सध्या रस्त्यात खड्डे पडले आहे.नुकताच पावसाळा सुरु झाल्यामुळे खड्ड्यात पाणी साचत आहे.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्याने पार्डी,सेवादास नगर, गणेशपुर, गाजीपूर,गोरेवाडी, जांमबाजार येथील नागरिकांना दररोज ये-जा करावी लागत आहे. तसेच दि. २७ जून रोजी शाळा महाविद्यालय सुरू होत आहे. या रस्त्याने मुले व मुली यांना दररोज सायकलने शाळेत जावे लागणार आहे.त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद यांना समस्त गावकऱ्यांनी व तेथील शेतकऱ्यांनी दिले आहे.

यावेळी माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन दत्तात्रय जाधव, दिपक सदाशिव मोरे,बाबाराव शेषेराव आंबोरे,सिद्धांत सुभाष केवटे,ज्ञानेश्वर सुभाष पैटणकर,समाधान केवटे, करण ढेकळे, अजय गरड, कृषी मित्र पंजाबराव ढेकळे,विश्वजीत सरनाईक,बी.डब्ल्यू. मुळे,गजानन काळे,सुदर्शन अनखुळे, प्रमोद दीक्षित, प्रकाश गोरे,अजय धुमाळ, संजय गोरे, संदीप आडगे, रमेश हडकुळे,गंगाराम बळी, शेख जावेद शेख अब्दुल, दत्ता मस्के, अनिल राठोड, दिपक सुरोसे, उत्तमराव चौरे,संतोष आंबोरे,विकास ढेकळे, दीपक केवटे,अनिल पवार, विजय पुरी,रवी जाधव, नामदेव फुटानकर,प्रशांत गव्हाणे, अनंतराज जाधव,कैलास पाईकराव,अरुण नागोळकर, ज्ञानेश्वर वाड,गजानन केवटे व लिम्बी-पार्डी,गणेशपुर, गोरेवाडी,गाजीपूर,जामबाजार,सेवादास नगर येथील शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...