आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:निफाडला क्षयरोग निदानासाठी मशिनची सुविधा ; तत्काळ उपचार सुरू

निफाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या निधीतून TRUENAAT मशीन उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित काेशिरे यांच्या हस्ते शुक्रवारी उप जिल्हा रुग्णालय उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. कोशिरे डॉ. राठोड यांनी मशिनची माहिती दिली. क्षयरोग रुग्णांना CBNAAT टेस्टसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात जावे लागत असे. या मशिनमुळे आता या रुग्णालयात मोफत तपासणी करण्यात येईल. ज्या रुग्णांना पंधरा दिवसांपेक्षा जास्त खोकला आहे व अंगात ताप येतो, जेवण कमी जाते, अशक्तपणा येतो, वजन कमी अशा रुग्णांनी क्षयरोगाबाबत थुंकी नमुना तपासणी व छातीचा एक्स-रेची मोफत तपासणी करून घ्यावी व नवीन TRUENAAT मशिनचा उपलब्धतेमुळे तालुक्याच्या ठिकाणीच हे रोगाचे निदान होऊन तत्काळ उपचार सुरू करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...