आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकत्याच गोवा येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुसदच्या नीता गणेश पतंगे हिने ७० किलो वजन गटात तामिळनाडूच्या स्पर्धकाचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले आहे, या तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीता गणेश पतंगे हिने नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल लेव्हल ओपन चंपियनशिप २०२२ मध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. पुसदच्या पँथर जुडो कराटे अकॅडमीची नीता विद्यार्थी असून नियमित सराव करीत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये छोट्याशा किराणा दुकानाच्या भरवशावर नीताला आवड असलेल्या जुडो कराटे मध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. आईच्या प्रोत्साहनामुळे तिने गोवा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये अठरा वर्ष वयोगटात ७० किलो वजन मध्ये काता या स्पर्धेत गोव्याच्या स्पर्धकांचा पराभव करीत सिल्व्हर तर फाईट मध्ये तामिळनाडू च्या स्पर्धकांचा पराभव करीत गोल्ड मेडल मिळविले आहे. तिने यशाचे श्रेय सुनीता पतंगे व सेन्साई संतोष कांबळे यांना दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.