आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:कुणी कुठेही जावो, आम्ही सेनेचा भगवा डौलानेच फडकवत ठेवू

यवतमाळ2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ झाले आहे. जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना नेत्यांनी त्यांची भुमिका अद्याप उघड केली नाही. तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेते शिवसेना सोडुन गेले तरी आम्ही सर्व संघटीत राहुन शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवु असा पक्का निर्धार करुन मोट बांधली आहे. इतकेच नव्हे तर यासंदर्भात शुक्रवारी सकाळी दत्त चौक येथे आंदोलनही करण्यात येणार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी बंड पुकारून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. बंडखोर आमदार गुवहाटीमध्ये असुन त्यांनी महा विकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावे असा प्रस्ताव दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींमध्ये संपुर्ण राज्यातील शिवसैनिकांप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

त्यातच जिल्ह्यातील शिवसेना नेते आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी या दोघांकडून अद्यापही त्यांची भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. या दोन्ही नेत्यांच्या संदर्भात विविध बातम्या पुढे येत आहेत. या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडल्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी काय करणार असा प्रश्नही शिवसैनिकांना पडला होता. मात्र कुठल्याही परिस्थितीत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडायचे नाही असा पक्का निर्धार सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी २४ जुन रोजी सकाळी ११ वाजता दत्त चौक येथे आंदोलन करणार आहेत.

संजय राठोड यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना आमदार संजय राठोड यांनी राज्यात सुरू असलेल्या या संपुर्ण राजकीय घडामोडी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यातच ते गुवहाटीला निघाले असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना नेता म्हणुन संजय राठोड यांच्या भूमिकेकडे शिवे सेनेचेच नव्हे तर सर्वच पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

ताईंच्या पत्राने वाढवला संभ्रम
शिवसेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहुन बंडखोर आमदारांवर कारवाई करु नका. त्यांच्या प्रस्तावाचा विचार करा अशी विनंती केली आहे. त्यामुळे खासदार भावना गवळी या देखील बंडखोर आमदारांनी घेतलेल्या भूमिकेची साथ देत असल्याचे दिसत आहे.

सर्व मिळून संघर्ष करू
महाराष्ट्रात सध्या शिवसेनेत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींनी आमदारांनी व खासदारांनी अगदी कोणीही असो कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख शिवसेना व पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहोत. शिवसेना एकसंघ ठेवणे हे आमचे सर्व पदाधिकाऱ्यांचे काम आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलानेच फडकत ठेवू.
पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

बातम्या आणखी आहेत...