आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकरनगर येथे बैलपोळा उत्साहात साजरा:कोणत्याच सरकारला शेतकऱ्यांच्या विकासाचा सूर आजपर्यंत गवसला नाही; डॉ. विष्णू उकंडे यांचे मत

दिग्रस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंकर नगर येथे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी साजरा केला. यावेळी युवा नेते डॉ. विष्णू उकंडे यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या विकासाचा सूर अद्याप कोणत्याच सरकारला गवसला नसल्याचे मत व्यक्त केले. पोळा हा शेतात राबणाऱ्या बैलाचा सण , एक कृतज्ञता म्हणून शेतकरी त्यांच्या कष्टात साथ देणाऱ्या बैलाचा सन मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्याच प्रमाणे शंकर नगर येथे ग्रामस्थांनी बैलांना सजवून त्यांची पूजा केली ,घास भरवून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शंकर नगर येथे युवा नेते डॉ विष्णु उकंडे यांनी बैलाची पूजा करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यानी शेतकऱ्यांबद्दल चिंता सुद्धा व्यक्त केली.

या जगाचा पोशिंदा शेतकरी असून त्यांच्यामुळे जगाला अन्न मिळते. परंतु स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवात ही शेतकरी आत्महत्या करतोय. तो पाल्याचे साधे शिक्षण करू शकत नाही, मुलीचे लग्न करू शकत नाही, मोठा आजार झाला तर पैसे कर्ज काढावे लागते, शेवटी कर्जबाजारी शेतकरी बांधवांच्या नशिबी असते, कोणत्याच सरकारला शेतकऱ्यांच्या विकासाचा सूर गवसला नसल्याचे सांगून जो पर्यंत शेतकऱ्या प्रति सकारात्मक धोरण स्वीकारणार नाही, तोपर्यंत अन्नदाता दुर्लक्षित राहणार असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी रतन राठोड, शंकर उकंडे, विठ्ठल पारधी, महादेव शिंदे, नंदू राठोड, खेमराज चव्हाण, नागमोते, नाटकर, नामदेव काळे, गोविंदा राठोड, तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...