आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:शहरात न. प. करणार नियोजनबद्ध वृक्षारोपण ; मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा पुढाकार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात दरवर्षी विविध संस्था, संघटना, शासकीय कार्यालये यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. मात्र त्यांच्यात कुठेही समन्वय नसल्याने काही विशिष्ट ठिकाणीच वृक्षारोपण होते. त्यामुळे शहरातील उर्वरीत परिसर तसाच राहतो. नेमकी हीच बाब लक्षात घेत पालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यंदाच्या पावसाळ्यात विविध सामाजीक संस्था, संघटना यांना एकत्र आनुन शहरातील विविध भागांमध्ये पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी अनेकजण सरसावतात. त्यात काही संस्था, संघटना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करतात तर काही केवळ फोटोसेशन पुरती झाडे लावतात. मात्र या वृक्षारोपणा दरम्यान कुठलाही समन्वय नसल्याने बऱ्याचदा नको त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. त्यामुळे ती झाडे दुर्लक्षित राहुन जगत नाही. परिणामी वृक्षारोपणासाठी केलेला खर्च आणि मेहनत दोन्ही वाया जातात. ही बाब लक्षात घेता यंदा पालिकेने वृक्षारोपणासाठी समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात शहरातील वृक्षारोपण करण्यासाठी योग्य असलेल्या जागा शोधण्यात येत आहे. त्यात केवळ मोकळ्या मैदानात नव्हे तर वृक्षारोपणासाठी योग्य असलेल्या इतर सर्व ठिकाणी त्या जागेची पाहणी करुन जागे नुसार योग्य वृ़क्षांची लागवड योग्य ठिकाणी करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यानंतर विविध संस्था, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोण कुठल्या ठिकाणी कुठल्या झाडांचे रोपण करणार याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागांमध्ये जागे नुसार योग्य झाडांचे रोपण पावसाळ्यात होईल. शिवाय त्याची निगा राखण्याचे कामही योग्य पद्धतीने करण्यात येईल असे नियोजन आहे. यंदा शहरातील रस्त्याच्या बाजुला असलेल्या जागा, मोकळ्या जागा, शासकीय कार्यालयांचे परिसर, विविध चौक, रस्त्यावरील डीव्हायडर या सर्व ठिकाणी वृक्षारोपणाचे नियोजन आहे. विशेष म्हणजे सर्व ठिकाणी १० फुटांपेक्षा मोठी झाडे लावण्यात येणार आहे. ती झाडे लवकर तग धरुन वाढतात. त्यामुळे यंदा मोठी झाडेच लावण्याचे नियोजन आहे. या वृक्षारोपणासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुढाकार घेतला असुन ते काही निधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही सांगण्यात आले

बातम्या आणखी आहेत...