आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:कामात जिद्द, चिकाटी, सातत्य असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्राचा अमृत महोत्सव हा सारा देश मोठ्या दिमाखदारपणे साजरा करत असताना त्यामध्ये आपलाही काही नाविन्यपूर्ण सहभाग असावा या हेतूने यवतमाळ येथील डॉ. आशिष गवरषेट्टीवार व त्यांचे दोन सहकारी मित्र यांनी नुकताच अवघ्या ६० तासांमध्ये एक हजार किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला. दि. २५ ऑगस्ट रोजी पहाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन यवतमाळ-नागपूर-चंद्रपूर-राजूरा-आसिफाबाद-हैद्राबाद-अदिलाबाद असा एकुण एक हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी अवघ्या ६० तासात पूर्ण केला. त्यानिमीत्त यवतमाळ येथील धन्वंतरी बचत गटाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे वेळी बोलताना ते सांगत होते की, जिद्द, चिकाटी व सातत्य जर आपल्या कामात असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते. आंतरराष्ट्रीय मानकानुसार एक हजार किमी.चा सायकला टप्पा हा ७५ तासात पूर्ण करणे गरजेचे असते परंतू आम्ही आमच्या इच्छाशक्तीच्या बळावर अवघ्या ६० तासात पूर्ण केला. प्रवासा दरम्यान आलेले चांगले अनुभव त्यांनी सांगीतले. आपल्या देशात सायकल प्रेमी हे भरपूर असून, प्रवासात सर्वांनी त्यांची काळजी व प्रेम दिले. या प्रवासामध्ये घरच्यांचे सुध्दा फार मोठे योगदान राहीले हे त्यांनी आवर्जून सांगीतले. सायकल चालवून आपली प्रकृती कशी ठिक ठेवायची याची त्यांनी आपल्या प्रवासात जनजागृती केल्याचे सांगीतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. समीर बेलोरकर, सहयोगी प्राध्यापक, द्रव्यगुण विभाग हे उपस्थित होते. त्यांनी आपले अध्यक्षीय भाषणात शरीरासाठी सायकल चालविणे हे कशा प्रकारे फायदेशीर आहे याचे महत्त्व पटवून दिले. सत्कारमूर्ती डॉ. आशिष गवरशेटृीवार यांना पुढिल वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमजीत सरगर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील कैटिकवार, सचिव धन्वंतरी बचत गट यांनी तर आभार डॉ. राजू चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाकरीता डॉ. जमधाडे, डॉ. पाटील, डॉ. निंबाळकर, डॉ. कदम, डॉ. वांगे, डॉ. पावडे, डॉ. गड्डमवार, गोळे, उगेमुगे, हांडे, दुर्गे, लिंगावार, रामटेके व इतर सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...