आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी होऊ घातली असताना तालुक्यातील १२ सेवा सहकारी संस्थांना अचलपूरच्या दुय्यम निबंधकांनी ६ एप्रिल रोजी निवडणुकीच्या धामधुमीत अंतरिम नोटीस बजावल्या. यामुळे सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी सोमवारी (दि. १०) सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन नोटीस बजावण्यावर आक्षेप घेत राजकीयदृष्ट्या प्रेरीत कारवाई असल्याचे म्हटले आहे. भुगाव, कांडली, बोरगाव पेठ, सालेपूर,निजामपूर, नायगाव, वडनेर भुजंग, शामपूर, खैरी, बोरगाव दोरी, कुष्ठा या १२ संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० ची कलम १०२ (१) (४) अन्वये सहाय्यक निबंधक अच्युत उल्हे यांनी ६ एप्रिल रोजी अवसायानाबाबत अंतरिम आदेश निर्गर्मित करत त्यावर अवसायाकांची नियुक्ती करत संस्था पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या ताब्यातील मालमत्ता अभीलेख, दस्तावेज, अवसायाकास सुपूर्द करण्याचे करण्यासह ४४ मेपर्यंत हरकती व आदेशाच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत संबंधितांनी सादर करावयाच्या आहेत.
ही प्रक्रिया अन्यायकारकस न्यायालयात दाद मागू सेवा सहकारी संस्थांना शेतकऱ्यांना कर्ज वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू असताना संस्था अवसायानात काढणे ही बाब योग्य नाही. तालुक्यात बाजार समितीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या सोसायटीमधील मतदार यादीत आलेले संचालकांची नांवे काही नेत्यांना मतदार म्हणून बाधक ठरू शकतात. म्हणून अवसायानाची ही प्रक्रिया अन्यायकारक आहे. या संदर्भात न्यायालयात दाद मागू, असे नंदकिशोर तुरखडे (अध्यक्ष, शामपूर सोसायटी), नरेंद्र ठाकरे (अध्यक्ष, कुष्ठा सोसायटी) व अनिल सांगोळे (अध्यक्ष, शिंदी सोसायटी) यांनी सांगीतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.