आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

132 ग्रा.पं.च्या 205 जागांसाठी पोटनिवडणूक‎:18 ला अधिसूचना, 25 एप्रिल ते 2 मे दरम्यान नामनिर्देशन, 18 मे रोजी मतदान‎

यवतमाळ‎ ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निधन, राजीनामा व अन्य कारणांमुळे‎ रिक्त झालेल्या जिल्ह्यातील १३२‎ ग्रामपंचायतींमधील २०५ जागांसाठी‎ पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या‎ अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने‎ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर‎ केला.‎ ‎ गेल्या एक वर्षापासून स्थानिक‎ स्वराज्य संस्थेवर प्रशासक आहेत.‎ त्यामुळे या निवडणुका कधी‎ लागतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले‎ आहे. असे असतानाही अजूनही‎ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या‎ निवडणुकीबाबत कुणीही स्पष्ट‎ बोलण्यास तयार नाही. अशात राज्य‎ निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या‎ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर‎ केला.

यात यवतमाळ जिल्ह्यातील‎ १३२ ग्रामपंचायतींतील २०५‎ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होणार‎ आहे. तर दोन ठिकाणी थेट सरपंच‎ पदाची निवडणूक होणार आहे.‎ पोटनिवडणुकीसाठी १८ एप्रिलला‎ अधिसूचना काढली जाणार आहे. तर‎ २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत रिक्त‎ जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल‎ करता येणार आहेत. तद्नंतर ३ मे‎ रोजी अर्जाची छाननी होणार असून,‎ दि. ८ मे पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे‎ घेता येणार आहे. त्याचदिवशी चिन्ह‎ वाटप केले जाणार आहे. आणि‎ प्रत्यक्षात दि. १८ मे रोजी मतदान‎ होणार आहे. काही महिन्याआधी मुदत‎ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या‎ निवडणुका झाल्या आहेत. तर सध्या‎ १५ बाजार समित्यांची निवडणूक सुरू‎ आहे‎.