आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील छोटी गुजरी परिसरातील एमपी जयस्वाल (शिवनाथ) वाईन बारमधील गोळीबार प्रकरणातील कुख्यात कवट्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर मुंबई अप्पर पोलिस महासंचालक यांच्याकडून मंजूरी मिळाली. बुधवार, दि. १ मार्चला यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्याकडून प्रकरण विशेष मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शेख अलीम उर्फ कवट्या शेख कलीम, शेख इमरान उर्फ कांगारू शेख शरीफ, रोहीत जाधव, नईम खान उर्फ नईम टमाटर गुलाब नबी खान, आदेश उर्फ आद्या खैरकार, साजीद उर्फ रिज्जू सलीम सयानी, अस्लम खान उर्फ मारी अकबर खान आणि नयन सौदागर अशी कवट्या गँगमधील आठ जणांची नावे आहे.
कुख्यात गुंड कवट्या गँगने पूर्वनियोजित कट रचून दारूच्या बिलावरून छोटी गुजरीतील बार मालकाशी वाद घातला होता. त्यानंतर बार मालकाला मारहाण करीत शेख अलीम उर्फ कवट्या याने देशी कट्ट्यातून फायर करत खंडणीची मागणी करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात एलसीबीने मकोका अंतर्गत कारवाई होण्याकरता प्रस्ताव तत्कालीन अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्याकडे सादर केला.
या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली असून कुख्यात कवट्या गँगवर मकोका काद्यान्वये कलम वाढ करण्यात आली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्याकडे देण्यात आला. संपूर्ण तपास झाल्यानंतर मुंबई अप्पर पोलिस महासंचालक यांच्याकडून मंजूरी मिळाली. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक संजय राठोड, विवेक देशमुख, अन्सार बेग, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, प्रशांत झोड, प्रविण उईके यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.