आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा रुपये पंधराशे एवढे तुटपुंजे मानधन देत आहे. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात राज्य शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी गुरूवार, दि. २३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरमहा एकत्रित २१ हजार रूपये किमान वेतन द्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागात कायम करा, आदी प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी दिवाकर नागपुरे, सीमा मेशराम, शींदू तीवशे, अंजना शिंदे, शांता माहुरकर, राजेश मेंढे, कवडू सीडाम, राहुल नगराळे, नितीन काळे, ओमप्रकाश पवार, लक्ष्मी जाधव, सुनीता आगोने, जनाबाई चंदनकर, निता भोयर, सीमा चौधरी, गंगाबाई पाईकराव, सुनीता राऊत, अर्चना परचाके, मंगला मेश्राम, सुभद्रा भिसनकर, राधाबाई पाटील, कविता चव्हाण, सुनीता मडावी, साईनाथ बल्की, देवराव झटे, रेखा सलाम, पद्मा वेळुकर, लक्ष्मी सोयाम, सुवर्णा केवटीवार, आसेफा शेख, मैरूनिसा शेख, शाहिस्ता जहीर, रहीसा शेख, साधना गांवडे, मालती गावडे, आशा भागडकर, मीरा पिंपरे, सुशीला राऊत, गीता पुसनाके, मारोती हांमद, श्रीराम राठोड, भाऊराव पवार, गजानन राठोड, संगीता खंडारे, चंदा चांमाठे, शोभा येवले, श्रावण उइके, मनीषा कोकाडे, लता आवळे, लक्ष्मी गेडाम, साधना गांवडे, शोभा देवतळे, संगीता झामरे, अर्चना खोब्रागडे यांच्या शेकडो शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.