आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:इंटकच्या अध्यक्षपदी ओ. बी. गावंडे यांची नेमणूक

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रिकल वकर्स युनियन (इंटक) च्या विदर्भ कार्यकारिणीची सभा रंगोली ग्राउंड परिसरातील निवृत्ती अभियंता भवन येथे रविवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास पार पडली. या सभेत विदर्भाध्यक्ष पदी ओ. बी. गावंडे यांची नेमणूक सर्वांनुमते करण्यात आली.

विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रिकल वकर्स युनियनच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची सभा रविवारी पार पडली. या सभेत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे संघटनेच्या नविन विदर्भ अध्यक्षांची निवड सुद्धा करण्यात आली.

यात अकोला येथील ओ. बी. गावंडे यांची विदर्भ अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली. यावेळी नागपूर, आकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदीया, यवतमाळ येथील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात यवतमाळ येथील विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रिकल वकर्स युनियनच्या यवतमाळ विभाग व उपविभाग ह्या सर्व पातळीवरील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नविन कार्यकारिणी येत्या काही दिवसांत निवड करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भाध्यक्ष ओ. बी. गावंडे यांनी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...