आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण:ओबीसी आरक्षण अबाधित; भाजप मोर्चाचा जल्लोष

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांठीया आयोगाच्या शिफारसी मान्य करुन ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे, असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मा. न्यायालयाच्या या निकालाचे बुधवार दि. २० जुलै रोजी यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या दत्त चौक येथे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचे मार्गदर्शनाखाली व राजेंद्र डांगे, राजू पडगीलवार, अमोल ढोणे, रेखा कोठेकर, माया शेरे, प्रशांत यादव, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल समदुरकर यांचे नेतृत्वात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बांठीया आयोगाने सादर केलेला इम्पिरिकल डेटा मा. सर्वोच्च न्यायालयाने मान्य करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण ठेवण्याचा निर्णय दिला आहे. गेल्या अडीच वर्षापासून भाजपा ओबीसी मोर्चाने केलेल्या पाठपुरावा आणि लढ्याला आलेले हे मोठे यश आहे. त्यामुळे हा आनंद साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...