आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पाच शाळांमधील ५२२ विद्यार्थ्यांची स्थूलपणा तपासणी करण्यात आली. यात २७३ मुले आणि २४९ मुलींचा समावेश आहे. तपासणीत चार मुले आणि चार मुली, असे आठजण स्थूल आढळून आले. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार स्थूलपणात जनजागृती व उपचार अभियानाचा प्रारंभ शनिवार, ४ मार्च रोजी झाला. दरम्यान, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, जन-औषध वैद्यकशास्त्र विभाग, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, औषध वैद्यकीय शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील वेदधारणी उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव नाथार इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ क्रांतिज्योती सावित्रीबाई नगर परिषद शाळा, माँ जिजाऊ नगर परिषद शाळा, महात्मा ज्योतिबा फुले नगर परिषद शाळेमधील ५२२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पार पडली.
यात स्थूलपणा निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात २७३ मुले, तर २४९ मुली, अशा ५२२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची तपासणी करून आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत. त्यात चार मुले आणि चार मुली, अशा आठ विद्यार्थ्यांना स्थूलतपणा असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही तपासणी अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. उमेश जोगे आणि पथकाच्या वतीने करण्यात आली आहे. अभियान रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष जतकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गौतम खाकसे, डॉ. विजय डोम्पले, डॉ. राजू गोरे, डॉ. गजानन सोयाम, डॉ. पंकज कासदेकर, डॉ. सचिन दिवेकर, डॉ. जबिह खान, डॉ. सरन्या, डॉ. सुजीत हे होते. त्याचप्रमाणे निवासी डॉक्टर, समाजसेवा अधीक्षक व आंतर वासिता विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
तपासणी अभियान राबवणार
स्थूलपणाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.जीवनशैली बदल व निरोगी शरीराबाबत तसेच स्थूलपणामुळे होणारे दुष्परिणामावर प्रतिबंधाबाबत अवगत करण्यात आले.सकस आहार व व्यायामाचे महत्वा सांगण्यात आले.यानंतरही हे अभियान राबवणार आहे. - डॉ.उमेश जोगे, नोडल अधिकारी,यवतमाळ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.