आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तज्ज्ञांचे मत:विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ऑफलाइन परीक्षा ठरली योग्य माध्यम

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना परिस्थितीवर विद्यार्थ्यांची यशस्वी मात गेली दोन वर्ष कोरोना परिस्थिती भयावह होती. या काळात सध्या १२ वीला असलेल्या विद्यार्थ्यांची १० वीची परीक्षा आणि ११ वीचे संपुर्ण वर्ष पार पडले. या दोन वर्षाच्या काळात कॉलेज आणि शिकवणी वर्ग पुर्णपणे बंद होते. अशा या गंभीर परिस्थितीतीवर विद्यार्थ्यांनी मात केली आहे. आजच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले चांगले गुण त्याची साक्ष देत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणामध्ये स्वत:हून घेतलेली मेहनत महत्वाची ठरली आहे. कोरोना परिस्थिती नसती आणि ऑनलाइन शिक्षणाएेवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन शिक्षण सुरू असते तर यंदाच्या या निकालात आनखी बराच फरक पडला असता. राजकुमार राठी, संचालक राठी क्लासेस

महागाव तालुका यंदाही अव्वल जिल्ह्यातील १६ ही तालुक्यांचे निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी-अधीक लागले आहे. त्यात यंदाही जिल्ह्यात महागाव तालुक्याने निकालात बाजी मारली असुन तालुक्याचा निकाल ९८.०५ टक्के लागला असुन हा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्याऊलट वणी तालुक्याचा निकाल ८६.७१ टक्के लागल्याने तो जिल्ह्यात सर्वात कमी निकाल असलेला तालुका ठरला आहे.

पुन्हा परीक्षा देणाऱ्यांचा निकाल ६० % बारावीच्या परिक्षा गेल्या वर्षीच्या प्रयत्नात उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ७२२ विद्यार्थ्यांनी यंदा पुन्हा बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. या विद्यार्थ्यांपैकी २२५ विद्यार्थी पास झाले. या विद्यार्थ्यांचा निकाल ६० टक्के इतका लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...