आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:डोंगरखर्डा येथील वृद्धाची गळफास लावून आत्महत्या; परिवारांवर दु:खाचे सावट

कळंब7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील शेतकरी कुटुंबातील वृध्दाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि. १९ जूनला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सहदेव तानबा ठाकरे वय ८० वर्ष असे मृत वृद्धाचे नाव आहे.

कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील सहदेव ठाकरे या शेतकऱ्याचे कुटुंबातील मुलगा, नातू, सुन सध्या खरीप हंगामाचे काम सुरु असल्याने पिंपळशेंडा शिवारात शेत असल्याने शेतात गेले होते. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांतील सदस्य घरी परत घरी आले असता, वृध्द सहदेव ठाकरे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...