आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व समन्वय समितीने १४ मार्चपासून महाराष्ट्रात बेमुदत संपाची घोषणा केली आहे. यानिमित्त नुकतीच अभ्यंकर कन्या शाळेत जिल्हा खासगी शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये संघटनांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये १४ मार्चपासून सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कशा पद्धतीने सहभागी होतील, यावर विविध संघटनांच्या प्रमुखांनी विचारविनिमय केला.
१४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काची जुनी पेन्शन मिळवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदन सादर केले.
यावेळी यवतमाळ जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, मुरलीधर धनरे, भुमन्ना बोमकट्टीवार, नीलेश तायडे, राजेश मदने, प्रदीप गोडे, नीरज डफळे, ताराचंद चव्हाण, पवन बन, संजय येवतकर, सतीश काळे, सचिन देशपांडे, विजय डांगे, अरविंद मांजरे, नितीन ठाकरे, संतोष पवार, सुधीर कानतोडे, विठ्ठल परांडे, किशोर राठोड, रवी उलगुडे, डॉ. निपून काळे, दत्ता मेकवाड, पराग पाटील, समाधान साबळे, युवराज गेडाम, इम्रान शेख, नागोराव चौधरी, रवींद्र दुरशेटवार, विजय विसपुते, श्रीकांत बोरकर, प्रफुल्ल गावंडे, प्रकाश काळमेघ, मन्साराम सावलकर, विकास वांदिले, प्रवीण जिरापुरे, डी. जी. भोयर, आर. एम. गौरखेडे, ज्ञानेश्वर गायकवाड, निर्मल कुमार खडसेसह अनेक पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी सहभागी होते. या वेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.