आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अंकुर साहित्य संघाने नंदादीप फाउंडेशन सेवा प्रतिष्ठान यवतमाळ येथील निराधार मनोरुग्णांना भोजनदान केले . अंकुर साहित्य संघाने गेल्या अनेक वर्षांपासून २६ जानेवारी निमित्त विविध सेवाभावी संस्थांना भेटी देऊन, यथोचित सहकार्य करत साहित्याची समाजाशी नाळ जुळवून ठेवली आहे. यावर्षी नंदादीप फाउंडेशन सेवा प्रतिष्ठान येथील बेघर मनोरुग्णांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे संदिप शिंदे, नंदिनी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. अंकुर साहित्य संघाच्या जिल्हा अध्यक्षा विद्या खडसे यांच्या नेतृत्वात जिल्हा सचिव नितीन धोटे, तालुका सचिव महेश मोकडे, कोषाध्यक्ष सुरेश राऊत, सुनील खडसे, प्रमिला, उमरेडकर, दिपा गुघाणे,उषा खटे, महेश किणगावकर, कल्पना उघडे, वंदना डगवार, मंगेश चौधरी, अलका राऊत, तात्या राखूडे, दत्ता चांदोरे, तोष्णा मोकडे, दीपा गुघाने आदि उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.