आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा‎:परधान समाजाच्या वतीने रविवारी‎ राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा‎

बाभुळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परधान समाजाच्या वतीने स्थानिक बालकृष्ण‎ मंगल कार्यालय आर्णी रोड यवतमाळ येथे‎ रविवार, दि. १२ फेब्रुवारीला सकाळी ११‎ वाजता राज्यस्तरीय वधू वर परिचय‎ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.‎ या मेळाव्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून‎ समाजबांधव व वधू वर उपस्थित राहणार‎ आहेत. या मेळाव्या निमित्तानेच वधू वर‎ परिचयाची स्मरणिका काढण्यात येणार आहे‎ तरी तरी महाराष्ट्रातील परधान समाजाच्या‎ वधू वरांनी आपल्या बायोडेटा व पासपोर्ट‎ साईज फोटो आयोजन समितीकडे पाठवावे व‎ आपले नावे स्मरणिकेत समाविष्ट करून‎ घ्यावे, असे आवाहन आयोजन समितीकडून‎ करण्यात आले आहे.‎

राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याच्या‎ नियोजनासाठी आयोजन समिती मागील‎ अनेक दिवसांपासून परिश्रम घेत आहेत. या‎ मेळाव्याच्या तयारीसाठी विविध समित्या‎ स्थापन करण्यात आल्या व प्रत्येक‎ समितीकडे विशेष जबाबदारी देण्यात आली‎ आहे. वधू वर परिचय मेळावा यशस्वी‎ करण्यासाठी व समाजातील प्रत्येकाला यात‎ सामावून घेण्यासाठी आयोजन समिती‎ कार्यरत आहे. मागील अनेक दिवसांपासून‎ आयोजन समितीकडून जिल्हा व जवळपास‎ प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन वधू वर‎ परिचय मेळाव्या बाबत नियोजन करण्यात येत‎ आहे.

समाजातील प्रत्येक नागरिकांनी‎ आपल्या गावातील, शहरातील, नातेवाईक,‎ परिचित वधू वरांना व परधान समाजातील‎ सर्व बंधु भगिनींना या मेळाव्यास उपस्थित‎ राहण्याचे आवाहन आयोजन समितीकडून‎ करण्यात आले आहे.‎ नुकतीच सदर मेळाव्याच्या नियोजनाबाबत‎ बाभुळगाव येथे बैठक घेऊन बाभूळगाव‎ शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त वधू‎ वरांनी व परधान समाजातील सर्व नागरिकांनी‎ १२ फेब्रुवारीला बालकृष्ण मंगल कार्यालयात‎ वधू वर परिचय मेळाव्याला उपस्थित राहावे‎ असे आवाहन संघटनेचे अंकुश सोयाम यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...