आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद गट क (वर्ग- ३) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवार, दि. ९ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २१ प्रशासकीय तर २० विनंती अशा ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी समुपदेशनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. तर बदली प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून बदल्यांचे चित्रीकरण करण्यात आले.
दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. अशा परिस्थितीत अडगळीत अडकलेल्या पात्र कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे बदल्यांच्या प्रतीक्षेत कर्मचारी होते. आता मात्र, कोविडचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे शासनानेसुद्धा जिल्हा परिषद गट क (वर्ग- ३) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याबाबत हिरवी झेंडी दिली होती. प्राप्त झालेल्या आदेशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संपूर्ण विभागाला सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्याबाबत सुचवले होते. त्यानंतर सोमवारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पाणी पुरवठा विभागातील एकही बदली प्राप्त कर्मचारी उपलब्ध नव्हते.
सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यकांमध्ये तीन प्रशासकीय, एक विनंती, विस्तार अधिकारी सांख्यिकी दोन विनंती, कनिष्ठ सहाय्यक तेरा प्रशासकीय, सहा विनंती, सिंचन विभागामध्ये कनिष्ठ अभियंता एक प्रशासकीय, एक विनंती, महिला आणि बालकल्याण विभागातील चार पर्यवेक्षिकांची विनंती बदली करण्यात आली आहे. कृषी विभागातील विस्तार अधिकारी एक प्रशासकीय, दोन विनंती तसेच बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता एक प्रशासकीय, एक विनंती बदली करण्यात आली. पहिल्या दिवशी २१ प्रशासकीय, २० विनंती अशा ४१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.