आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:सेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळेंच्या वाढदिवसानिमित्त; साध्या पध्दतीने तसेच सामाजिक उपक्रमांनी साजरा

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी अत्यंत साध्या पध्दतीने तसेच सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. रक्तदान, अन्नदान, क्रीडा स्पर्धा तसेच गोरगरिबांना कपडे, दप्तर, वह्या वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. व्यापारी आघाडी शहर प्रमुख संतोष चव्हाण व कमल मिश्रा यांच्या पुढाकारात जामनकर नगर प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख प्रवीण निमोदिया, ओबीसी आघाडी विधानसभा संघटक राजू बोडखे, संजय उपगनलावार राहुल गंभीरे उपस्थित होते. संकल्प युवा प्रतिष्ठानचे ऋषिकेश सराफ यांच्या पुढाकारात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अन्न दानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

रुग्णांच्या जवळपास पाचशे नातेवाइकांची जेवणाची व्यवस्था वाढदिवसानिमित्त करण्यात आली होती. यावेळी ओबीसी संघटक राजू बोडखे, राजेश राऊत, श्याम थोरात, काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णा पुसनाके उपस्थित होते. समाजात कौतुकास्पद कामगीरी करणा-यांचा बाळासाहेब जयसिंगपुरे यांच्या पुढाकारात उमरसरा येथे प्रभाग क्र २२ मध्ये सत्कार करण्यात आला. वाहतूक सेना जिल्हा संघटक शैलेश गाडेकर, व्यापारी आघाडी तालुका संघटक मनीष लोळगे व शिवसैनिक नीलेश लडके यांचे पुढाकारात यवतमाळ शहरातील घंटागाडी चालवून शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला.

ह्या प्रसंगी सर्व घंटागाडी चालकांची व सहकाऱ्यांची भोजन व्यवस्था देखील करण्यात आली. यावेळी ओबीसी आघाडी विधानसभा संघटक राजू बोडखे, सतीश सकट, संजय उपगन्नावार, राहुल गंभीरे, राजू राऊत, शाम थोरात, दशरथ शेजूळकर उपस्थित होते. शहरातील थोर पुरुषांच्या प्रतिमांची तसेच परिसरातील स्वच्छता करण्यात आली. ह्या उपक्रमात राजू बोडखे, अभिनव वाडगुरे, राजू राऊत, शंकर देऊळकर ह्यांनी पुढाकार घेतला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये जयहिंद चौक येथे पवन अराठे व मित्र परिवारातर्फे पराग पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...