आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांमध्ये क्रीडाविषयक‎ जनजागृती:महिला दिनानिमित्त‎ 14 ते 21 मार्च दरम्यान‎ विविध क्रीडा स्पर्धा‎

वाशीम‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त‎ जिल्हा क्रीडा संकुल परिसरात १४‎ ते २१ मार्च दरम्यान महिलांसाठी‎ विविध क्रीडा स्पर्धा आयोजित‎ करण्यात आल्या आहेत.‎ महिलांमध्ये क्रीडाविषयक‎ जनजागृती निर्माण व्हावी हा या‎ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.‎ आठ दिवस आयोजित‎ करण्यात आलेल्या या उपक्रमात‎ कराटे, किक बॉक्सिंग, रायफल‎ शुटीग, धनुर्विद्या, फुटबॉल, लॉन‎ टेनिस, बॅडमिंटन व मॅरेथॉन या‎ क्रीडा स्पर्धा होती. एकविध खेळ‎ संघटना, जिल्हा प्रशासन व क्रीडा‎ विभागाच्या संयुक्त विद्यमाने‎ आयोजित करण्यात येणार आहे.‎ जिल्हयातील ३०, ४० व ५० या‎ वयोगटातील महिलांच्या‎ वजनगटनिहाय या स्पर्धा होतील.‎ शहर तसेच संपूर्ण जिल्हयातील‎ महिलांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये‎ मोठ्या संख्येने सहभागी नोंदवावा.‎ त्यासाठी वाशीम येथील जिल्हा‎ क्रीडा अधिकारी कार्यालयात‎ नोंदणी करावी, असे आवाहन‎ जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता‎ यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...