आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सुकता शिगेला:मंगळवारी पुरातत्व ची टीम पोहोचणार दारव्ह्यात; बहुचर्चित पोकलमाळ डोंगरांचे होणार सर्व्हेक्षण;

दारव्हा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारव्हा तालुक्यातील जवळा येथील बहुचर्चित पोकळमाळ या डोंगराचे सर्वेक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली यांच्या नागपूर विभागीय टीमचे मंगळवारी पोकलमाळ डोंगरावर आगमन होणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रव्यापी मातृभूमी भेदभाव निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव राठोड यांनी दिली आहे.दारव्हा तालुक्यातील जवळा शिवारात साखरा रोडलगत असलेल्या पोकलमाळ या डोंगराच्या ऐतिहासिक महत्व ऐकून या स्थळी प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

या ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी जमिनीत एका रांगेत उभ्या गाढून असलेल्या दगडी शिळाचे फोटोग्राफ्स राठोड यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग दिल्ली यांच्याकडे पाठवून या पोकलमाळ टेकडीचे धार्मिक, सांस्कृतिक तथा ऐतिहासिक ठेव्याचे रहस्य उलगडण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. पुरातत्व विभाग दिल्ली यांनी या लेखी मागणीची गंभीर दखल घेऊन प्रादेशिक कार्यालय नागपूर यांना या बहुचर्चित पोकलमाळ टेकडीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशित केले. प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील पुरातत्व अधिकाऱ्यांनी राठोड यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून येत्या मंगळवारी ही टीम पोकलमाळ टेकडीचे स्थळ निरीक्षण आणि सर्वेक्षणासाठी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दाखल होणार असल्याचे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...