आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन सराफा भावंडांची चौकशी:दीड किलो सोने; ३५ किलो चांदीच्या शोधात मुंबई पोलिस यवतमाळात

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल चार कोटींच्या सोने-चांदी फसवणूक प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांचे पथक गेल्या दोन दिवसापासून यवतमाळात तळ ठोकून आहे. यातील दीड किलो सोने आणि ३५ किलो चांदीची विक्री यवतमाळ झाल्याचे बोलल्या जात असून शनिवारी मुंबई पोलिसांनी यवतमाळ शहर पोलिसांच्या मदतीने शहरातील दोन सराफा भावंडांची चौकशी सुरू केली आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान येथील गजानन अग्रवाल वय ३८ वर्ष याचा मामा सोन्या-चांदीचा मोठा व्यापारी आहे. मामाकडे गजानन हा कमिशन एजंट म्हणून काम करत होता. मामानी दिलेल्या सोन्या-चांदीची विक्री तो सोनाराकडे करीत होता आणि त्याचे पेमेंट मामाला पाठवत होता. कमिशन एजंट म्हणून काम करता-करता गजानन याने सोन्या-चांदीची परस्पर विक्री करीत मामाची तब्बल चार कोटीने फसवणूक केली. ही बाब त्याच्या मामाच्या लक्षात येताच मामाने थेट मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात भाचा गजानन अग्रवाल याच्या विरोधात २०२२ मध्ये या चालू वर्षात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून गजानन अग्रवाल याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान यातील दीड किलो सोने आणि ३५ किलो चांदी यवतमाळात विक्री केल्याची कबूली गजानन याने पोलिसांना दिली. त्यावरून दोन दिवसापासून मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सुशील कुमार वंजारी यांच्यासह पथक यवतमाळात तळ ठोकून होते. दरम्यान ६ ऑगस्टला दोन सराफा भावंडांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...