आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन बोलावलेला ड्रेस पसंत न आल्याने परत करण्यासाठी ग्राहकाने संबंधीत कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला असता त्या क्रमांकावर बोलणाऱ्या व्यक्तीने पेटीएम आणि फोन पे चा लिंक क्रमांक विचारुन तब्बल दीड लाख रुपयाने गंडा घालण्यात आल्या. या प्रकरणात संबंधीत ग्राहकाने मंगळवार दि. २१ जुन रोजी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली.
या संदर्भात लक्ष्मीकांत रेणूकादास तिवारी वय २० वर्ष रा. कळंब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. ८ जून रोजी त्यांनी जीओ कंपनीचे मोबाईल नंबर वरुन sassxreel.com या वेबसाईटवरुन बहिणीसाठी ऑनलाईन ड्रेसची ऑर्डर दिली. १३ जून रोजी ड्रेसचे पार्सल घरी आले. ८०० रुपये नगदी देऊन तक्रार दाराचे आईने पार्सल सोडविले. मात्र ते उघडुन पाहीले असता ड्रेस खराब दिसल्याने फिर्यादीने त्याचे मोबाईल वरुन ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी sassxreel.com या साइडवर गेला असता ऑर्डर कॅन्सल होत नव्हती. त्यामुळे त्याने त्या वेबसाइटवर जाऊन संपर्क क्रमांक ९०९३६७३३८६ मिळवला.
या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने काय तक्रार आहे म्हणून विचारले. त्यावर यांनी माहिती दिली असता त्याने तुमची ऑर्डर कॅन्सल झाली ८०० रुपये तुमचे खात्यात जमा होते त्यासाठी तुमचा पेटीएम फोन पे चा लिंक नंबर पाठवा सांगितले. त्यावरुन फिर्यादीने त्याला पेटीएमचा लिंक नंबर पाठविला. पेटीएमचा लिंक नंबर मिळताच त्याने फिर्यादीला एक मेसेज टाकला व तो टीपी नंबर फार्वड करण्यास सांगितले. फिर्यादी ने टीपी नंबर फार्वड करताच तुमचे समाधान होईल म्हणून सांगितले. दरम्यान तक्रारदारांच्या स्टेट बँक शाखा कळंब येथील खात्यातून ८ वेळा व्यवहार करुन एकूण १ लाख ५४ हजार २७६ रुपये परस्पर काढुन घेण्यात आले. पैसे कटल्याचे मेसेज येताच तक्रारदार यांनी बॅंकेत जाऊन खात्याची चौकशी करून खाते बंद करण्यास सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.