आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गतवर्षी विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश दिला होता. यंदा मात्र, दोन गणवेश देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका शासकीय शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती, बीपीएल सर्व मुले, असे मिळून एक लाख ५६ हजार ४१६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रती गणवेश तीनशे रूपये प्रमाणे ९ कोटी ३८ लाख ४९ हजार ६०० रूपये मंजूर झाले आहे.
दरवर्षी जिल्हा परिषद, नगर पालिका आणि शासकीय शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती, दारिद्र रेषेखालील मुलांना सर्व शिक्षाच्या वतीने मोफत गणवेश देण्यात येते. मागिल वर्षी कोविड-१९ च्या वाढलेल्या संसर्गामुळे शाळा उशिराने चालू झाल्या. अशा परिस्थितीत एकच गणवेश मंजूर करण्यात आला होता.
जिल्ह्यातील एक लाख ५४ हजार ३४ विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला होता. यंदा मात्र, दोन गणवेश देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये ९१ हजार २९० सर्व मुली, १० हजार ३३८ अनुसूचित मुले, २१ हजार ११६ अनुसूचित जमाती, तर ३३ हजार ६५२ दारीद्र रेषेखालील, अशा मिळून एक लाख ५६ हजार ४१६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रती गणवेश तीनशे रूपये प्रमाणे ९ कोटी ३८ लाख ४९ हजार ६०० रूपये मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे यंदा गणवेशाचा निधी लवकरच मंजूर झाला आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशात यावे, असा मानस प्रशासनाचा आहे.
आता मंजूर झालेला निधी आठवड्याभरात सोळा ही पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यात वळते करण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे गणवेश राहिल, ह्या उद्देशाने पावलं उचलावे, असे आदेश जारी करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.