आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थी जीवनात जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाचे सातत्य ठेवले तर अवघड असणारे यशाचे शिखर सहज गाठता येते. दुःखाचा डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ लागत नाही. यशाच्या शिखराला गवसणी घालण्यासाठी परिश्रमाशिवाय दुसरा कोणताही शॉर्टकट नाही, असे प्रतिपादन उमरखेडपोलिस ठाण्याच्या सहायकपोलिस निरीक्षक सुजाता बनसोड यांनी केले.
कस्तुरबा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुलाबसिंह ठाकुर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुजाता बनसाडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. एल. एम रावते होते. तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव आनंदराव शेवाळकर, सहसचिव किशोर ठाकुर, कृ. उ. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, रमन रावते, महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. बी. शिंदे, प्रा. दिपक वाघमारे आदि उपस्थित होते. पुढे बोलतांना सुजाता बनसोड म्हणाल्या की, मुलींनी आता मुलांच्या बरोबरीत नव्हे तर एक पाउल पुढे टाकले पाहिजे.
युपीएसी, एमपीएससी या सारख्या स्पर्धा परीक्षेची जय्यत तयारी करून मोठ मोठया हुद्दयाच्या प्रशासकीय जागा काबीज केल्याच पाहिजे. त्यासाठी खुप वाचन करणे आणि नियमित अभ्यासासोबतच शिकवणीची ही गरज पडल्यास त्यासाठीही पालकांनी तयारी ठेवावी सावित्रीच्या जीवनात तुम्हाला अबलाचे सबला करण्यासाठी अनेक संकटे आली पण त्या डगमगल्या नाहीत ती परीस्थीती तुमची नाही तुम्हाला सर्व काही सेवा सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही फायदा घ्यावा असे त्यांनी उपस्थिती विद्यार्थिनींना आवाहन केले.
संचालक संभाजी ताटीकुंडलवाड, बिरबल केषेवाड, डॉ. लक्ष्मीकांत चिन्नावार, प्राचार्य एस. बी. शिंदे, पर्यवेक्षक प्रा. दिपक वाघमारे, से. नि. पर्यवेक्षक आर. जी. चव्हाण, सामाजीक कार्यकर्ते हिरासींग चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी हिरासींग चव्हाण यांनी गुलाबसींह ठाकुर साहेबांच्या शैक्षणीक कार्याचा गुण गौरव केला. बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी कन्या शाळेचे रोपटे वट वृक्षात रूपांतर झाले. याचे श्रेय मॅनेजमेंट कमिटीला जाते. असे बोलून दाखविले. हिरासींग चव्हाण यांनी यावर्षी या महाविद्यालयाच्या इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक जाहिर करून प्राचार्या शारदा शिंदे यांच्या हाती बक्षिसाची रक्कम सोपवीली. संचालन ए. ए. आलोने तर आभार राहूल चंद्रे यानी मानले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.