आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीने पकडले:दोन तलवारी बाळगणाऱ्या एकास एलसीबीने पकडले

पुसद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अखेरत नगर येथे एका तरुणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने दि. २१ नोव्हेंबरला सापळा रचून घरावर धाड टाकली असता, दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. धाडीत आरोपीलाही देखील स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. शेख मुखलीस शेख सलीम वय २५ वर्ष रा. अखेरत नगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

काही दिवसापुर्वी पुसद शहरातील मुखरे चौकात अंदाधुंद झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेणे सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक पुसद परिसरात असतांनाच दि. २१ नोव्हेंबरला पथकाला वसंतनगर ठाण्याच्या हद्दीतील अखेरत नगर येथे राहणारा शेख मुखलीस शेख सलाम याच्याकडे घातक शस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ अखेरत नगर येथे पोहचून शेख मुखलीस याच्या घराची झडती घेतली असता, घरझडतीमध्ये दोन लोखंडी धारदार तलवारी ज्याची किमंत दोन हजार रुपयाच्या मिळून आल्या. त्या तलवारी जप्त करून शेख मुखलीस पुढील कार्यवाही करीता वसंतनगर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, यांच्या मार्गदर्शनात एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पंकज पातुरकर, मो. ताज यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...