आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व तयारी:एक दिवस समाजासाठी हा संकल्प‎ करून पोहरागड येथे उपस्थित राहावे‎

आर्णी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण भारतातील बंजारा समाजाची‎ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या‎ पोहरादेवी येथे ५९३ कोटी रुपयांच्या‎ विकासकामाचे भूमिपूजन व संत‎ सेवालाल महाराजांचा पंचधातूच्या‎ पुतळ्याचे अनावरण, तसेंच सर्वात‎ मोठ्या सेवाध्वजाची स्थापना येत्या १२‎ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.‎ त्यानिमित्ताने बंजारा समाज समन्वय‎ समिती आर्णीच्या वतीने पूर्व तयारी सभा‎ शनिवार, ४ फेब्रुवारी ला स्वामी‎ विवेकानंद विद्यालय आर्णी येथे‎ आयोजित करण्यात आली.

या सभेत १२‎ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला‎ ‘एक दिवस समाजासाठी हा संकल्प‎ करून मोठया संख्येने उपस्थित राहावे’,‎ असे आवाहन बंजारा समाजाचे नेते तथा‎ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी‎ केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यावेळी व्यासपीठावर अनिल आडे,‎ राजूदास जाधव, प्रकाश राठोड, एन. टी.‎ जाधव, विपीन राठोड, डॉ. विष्णू उकंडे,‎ रोहिदास राठोड, अँड. आरुणा राठोड,‎ जीवन जाधव, डॉ.रामचंद्र चव्हाण, रंजित‎ नाईक, अनिल उपस्थित होते. १२ फेब्रुवारी‎ ला होणाऱ्या ५९३ कोटी रुपयाच्या विकास‎ कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला जनतेने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपस्थित रहावे असे आवाहन केले.‎

यावेळी उपस्थित समाज बांधवाना‎ मार्गदर्शन करताना संजय राठोड म्हणाले‎ की, संत सेवालाल महाराज यांचा पंच‎ धातूचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण‎ व सर्वात मोठया सेवाध्वज ची स्थापना‎ करण्यात येणार आहे. शिवाय बंजारा‎ समाजाच्या २१ मागण्या संदर्भात राज्याचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस यांच्या सह राज्यातील‎ विविध खात्याचे मंत्री यांच्याकडे‎ समाजाच्या माध्यमातून मागण्या मांडता‎ येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ राजूदास जाधव, तर संचालन सुरेश पवार‎ यांनी केले. यावेळी तालुक्यातील असंख्य‎ बंजारा बांधव उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...