आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्रस शहरातील घटना:धावंडा नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू ; अंघोळीसाठी उतरला होता धावंडा नदी पात्रात

दिग्रस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गंगानगर भागाजवळील धावंडा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा शुक्रवार, दि. ९ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता पाय घसरून पडल्याने नदी पात्रात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह दिग्रस हिंदू स्मशानभूमीजवळ शनिवार, दि. १० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नदी पात्रात तरंगताना दिसला. असता नागरिकांनी त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. विजय राजाराम जाधव वय ३५ वर्ष रा.गंगानगर, दिग्रस असे मृताचे नाव आहे.

शहरातील गंगानगर भागाजवळील धावंडा नदी काठावर दि. ९ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता मृत विजय जाधव हे आंघोळ करण्यासाठी म्हणून गेला होता. दरम्यान नदी काठी गेल्यानंतर विजयचा पाय घसरल्याने तो सरळ धावंडा नदीपात्रात पडला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित युवराज खंडारे, शिवा नैताम यांनी नदी पात्रात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ९ वाजता दिग्रस हिंदू स्मशानभूमीजवळील नदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. यावेळी मासेमारीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगी असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात बाबाराव पवार, गजानन चव्हाण व वसंता जाधव करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...