आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:पदवीधर साठी केवळ एक हजार 388 मतदारांची नोंदणी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काही महिन्यात अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडणार असून त्यासाठी १ ऑक्टोबर पासून मतदार नोंदणीची प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. मात्र या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात आजवर केवळ एक हजार ३८८ मतदारांची नोंदणी झाली आहे. ७ नोव्हेंबर ही मतदार नोंदणी करण्याचा अंतिम दिवस आहे.

२०२३ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी बैठकी घेण्यास सुरवात केली. तसेच मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रभागनिहाय अधिकारी नियुक्त केले आहे. जिल्ह्यात सुमारे ३५ हजारांवर पदवीधर कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तरी पदवीधर मतदार नोंदणीकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...