आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने वाहतुकीसाठी बंद असलेला उड्डाणपूल भाजपच्या कार्यकर्त्यांनी खुला केला होता. परंतु, मविआ सरकारच्या दडपणाखाली प्रशासनाने सदर उड्डाणपूल पुन्हा बंद केला. दरम्यान दोन दिवसात उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान प्रशासन विरोधात भाजपने उड्डाणपुलाखाली आंदोलन सुरू केले.
वाशीमवरून पुसद, अमरावती कारंजा, मंगरूळपीर व नागपूर मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वे फाटकामुळे नाहक त्रास सोसावा लागत होता. कधीकधी तासन् तास रेल्वे फाटक बंद राहते. यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागतात. नागरिकांचा हा त्रास दूर व्हावा म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सदर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल मंजूर केला. तीन महिन्यापासून पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडे उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. भाजपने सदर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला होता.
परंतु, प्रशासनाने पोलिस बंदोबस्त लावून उड्डाणपूल पुन्हा बंद केला. या विरोधात भाजपने उड्डाणपुलाच्या पायथ्याशी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच होते. दोन दिवसात उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे, जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे, शाम बढे, माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, अंबादास कालापाड, सुखदेव भोयर, नागोराव वाघ, मोहन गोरे, धनंजय हेंद्रे, मिठूलाल शर्मा, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, गणेश खंडाळकर, शरद चव्हाण, सचिन शर्मा, मनीष मंत्री, सुनिल राऊत, नवीन शर्मा, रूपाली देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.