आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळपीक:संत्रा, मोसंबी फळपिकांचा काढता येणार विमा ; संत्रा 14, तर मोसंबी पिकासाठी 30 जून पर्यंत करता येणार नोंदणी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळ पिक लागवड होते. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पूर्वी संत्रा, मोसंबी पिक ह्यात नव्हते. मात्र, मागिल वर्षीपासून संत्रा आणि मोसंबी पिकाला ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील राळेगाव, आर्णी, उमरखेड, कळंब, दारव्हा, महागाव, दिग्रस, नेर, पुसद, बाभूळगाव तालुक्यातील महसुली मंडळाचा समावेश आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिक विमा योजना २०२२-२३ मध्ये संत्रा, मोसंबी ह्या फळपिकास शासनाने जून २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.संत्रा व मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार असून, शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये चार हजार प्रति हेक्टर रक्कम भरावयाची आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरिता संत्रा पिकाची अंतीम दि. १४ आणि मोसंबी पिकाची अंतीम दि. ३० जून आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात मोसंबी पिकासाठी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे, तर संत्रा पिकासाठी आर्णी तालुक्यात आर्णी, जवळा, उमरखेड तालुक्यात उमरखेड, मुळावा, ढाणकी, विडूळ, चातारी, कुपटी, निंगणुर, कळंब तालुक्यात कळंब, कोठा, सावरगांव, जोडमोहा, पिंपळगांव रु., मेटीखेडा, दारव्हा तालुक्यात दारव्हा, महागाव, लोही, दिग्रस तालुक्यात दिग्रस, कलगांव, तिवरी, तुपटाकळी, सिंगद, नेर तालुक्यात माणिकवाडा, वटफळी, शिरजगांव, मालखेड बु., पुसद तालुक्यात पुसद, जांबबाजार, वरुड, बोरी खु., गौळ खु., बाभुळगाव तालुक्यात घारफळ, महागाव तालुक्यात मोरथ, गुंज, काळी दौ., कासोळा, राळेगाव तालुक्यात राळेगाव, झाडगाव, धानोरा हे महसुल मंडळ अधिसूचित करण्यात आले आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...