आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समित्यांचे गठन:जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांच्या खेळ व क्रीडा‎ स्पर्धेचे 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान आयोजन‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शिक्षण विभाग यवतमाळ‎ यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांच्या खेळ व‎ क्रीडा स्पर्धेचे आयोजन ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान नेहरू‎ स्टेडियम येथे करण्यात आले आहे. याकरिता १‎ फेब्रुवारीला दप्तर समिती, मैदान समिती, स्वागत‎ समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली. याप्रसंगी‎ गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी‎ दीपिका गुल्हाने, विस्तार अधिकारी नलिनी वंजारी‎ यांची प्रमुख उपस्थिती होती.

दप्त समितीचे प्रमुख‎ शहाजी घुले यांच्या नियंत्रणात दप्तर समितीचे‎ नियोजन करण्यात आले. तसेच विविध तालुक्यातून‎ आलेल्या विजयी विद्यार्थ्यांच्या याद्या अद्यावत आहे‎ की नाही, याबाबत नियोजन करण्यात आले. याप्रसंगी‎ दप्तर समितीचे शहाजी घुले, मारोती काळेकर,‎ पुंडलिक रेकलवार, किरण मानकर, राधेश्याम चेले,‎ राजहंस मेंढे, अनिल उत्तरवार, पंकज मात्रे, सुबोध‎ बेलगमवार, पुरुषोत्तम ठोकळ आदींची तसेच मैदान‎ समिती, स्वागत समिती प्रमुखांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...