आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातीलच नव्हे तर तालुक्यातील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शांततेला नख लावणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसी खाक्या दाखवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी केले आहे. आर्णी तील प्रतिष्ठित सुवर्णकार सुरेंद्र गावंडे यांना सोनेरी टोळीने २० लाखांचा गंडा घातला होता.
अवघ्या काही दिवसातच पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेरी टोळीला पोलिसांनी गजाआड केले. पोलिस अधीक्षक यांनी कार्यतत्परता कौतुकास्पद असल्याने जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या सह सुरेंद्र गावंडे यांनी सपत्नीक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महागाव तालुक्यातील अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. सोबत अवैध व्यावसायिक यांची कुंडली काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अवैध व्यवसायातून गुन्हेगारीला चालना देणाऱ्याचीही गय केल्या जाणार नाही.
महागाव तालुक्यात खोट्या तक्रारी पोलिस ठाण्यात येत असल्याचे प्रकार प्रथमदर्शी समोर येत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांना कानमंत्र देण्यात येणार येणार असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. महागाव पोलिस ठाण्यात अनेक दिवसापासून प्रभारावर आहे. पोलिसांचे संख्याबळही कमीच आहे. पोलिस वसाहतीचे काम संथगतीने सुरू असून याकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष वेधावे अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्याशी चर्चे दरम्यान केली आहे. लवकरच याकडे स्वतः लक्ष देवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.