आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात संवर्ग एक आणि दोनमधील शिक्षकांच्या पोर्टलवर नोंदी झाल्या होत्या. तद्नंतर याद्या सुद्धा प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवण्यात आले होते. यात संवर्ग एकचे ११ आणि संवर्ग दोनचे ७, असे मिळून १८ शिक्षक कागदपत्र पडताळणीत आऊट झाले आहे. आता संवर्ग एक आणि दोनचा त्या शिक्षकांचा दर्जा रद्द झाला आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांना सुरूवात झाली आहे. बदल्यांच्या अनुषंगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार सर्वप्रथम संवर्ग एक आणि दोनच्या शिक्षकांना बदली पोर्टलवर नोंदी करण्याचे निश्चित झाले होते. याकरीता दिलेल्या कालावधीत संवर्ग एकमध्ये एक हजार २०३, तर संवर्ग दोनमधून १६० शिक्षकांनी नोंदी केल्या होत्या.
तद्नंतर मंगळवार, दि. २९ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. २ डिसेंबर २०२२ रोजी पर्यंत शिक्षकांना आक्षेप नोंदवण्याचा अवधी देण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवर्ग एक आणि दोनच्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली होती. तर पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संवर्ग एक आणि दोनच्या शिक्षकांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.