आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ६ ते १२ जून या कालावधीत बँक क्रेडिट आऊट रिच मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत गेल्या तीन दिवसांत एकूण १७ हजार ७२५ लाभार्थींना १९१ कोटी ५५ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे. लाभार्थ्याना कर्ज वाटपाचे धनादेश, मंजूरी आदेश बुधवार, दि. ८ जून रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बँक ऑफ महाराष्ट्राचे आंचलीक प्रबंधक संजीव कलवले, क्षेत्रीय प्रबंधक मृत्युंजय पांडा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक बी.पी.सामंत, जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक दीपक पेंदाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर प्रामुख्याने उपस्थित होते. बँक क्रेडिट आउट रिच कार्यक्रमाच्या माध्यमातून पीक कर्ज, कृषी आधारित उद्योगांना कर्ज व शैक्षणिक कर्जाचे तसेच महिला बचत गटांना कर्जाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व बँकर्सने लाभार्थ्यांशी चागले वर्तन करावे, क्षुल्लक अडचणीसाठी वेळ न घालवता छोट्या गोष्टी तत्परतेने निकाली काढून शेतकऱ्यांना विनाअडथळा तसेच सोप्या पद्धतीने कर्ज पुरवठा करावा. कर्जासाठीच्या अर्ज मंजूरीचा कालावधी कमी ठेवून कर्ज मंजूर करावे, असे सांगितले.
लाभार्थ्यांना सकारात्मकतेने कर्ज वितरण करा ^महिला बचत गटांना कर्ज वाटप, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन योजना, बचत गटाचे क्रेडिट लींकेजचे आदि शासनाच्या प्रमुख योजनांमध्ये लाभार्थींना सकारात्मकतेने कर्ज वितरणाचे काम करावे. अमोल येडगे, जिल्हाधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.