आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा देखभाल दुरुस्ती:सात कंत्राटी अभियंत्यांवर समग्रचा कारभार

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समग्र शिक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या वर्ग खोली बांधकाम, शाळा देखभाल दुरुस्तीसह इतर कामांवर देखरेखीकरीता कंत्राटी अभियंते कार्यरत आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेकांनी स्वत:हनू काम सोडून दिले. तर शासनाने सुद्धा नव्याने भरती केलीच नाही. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सात अभियंत्यांवर समग्र शिक्षाचा कारभार चालू आहे. कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

समग्र शिक्षाच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या इमारती, वर्गखोली, शौचालय आणि इतरही बांधकामावर देखरेख ठेवण्याकरीता अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्याभरात सोळा आणि एक मुख्यालयात, असे मिळून १७ अभियंते कार्यरत होते. मात्र, शासनाने गेल्या दहा वर्षांत अभियंत्यांच्या मानधनात दमडीचीसुद्धा वाढ केली नाही.

अशा परिस्थितीत जिल्ह्याभरातील ९ अभियंत्यांनी समग्र शिक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या काही वर्षांत टप्याप्प्याने अभियंत्यांनी समग्र शिक्षाचे काम सोडून दिले. तद्नंतर शासनानेसुद्धा नवीन पदभरती करण्याच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेतला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत शासनाचे उदासीन धोरण आहे. अशा परिस्थितीत सध्या जिल्ह्याभरात मिळून ७ कंत्राटी अभियंते कार्यरत असून, ह्या सात अभियंत्यांकडे लगतच्या तालुक्याचा प्रभार सोपवला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून वाढले नाही मानधन
जिल्ह्यात सध्या ७ कंत्राटी अभियंते कार्यरत आहेत. या अभियंत्यांच्या मानधनात १० वर्षांपूर्वी काहीअंशी वाढ मंजूर करण्यात आली होती. या वाढीनंतर आतापर्यंत मानधनामध्ये दमडीची ही वाढ केली नसल्याची खंत अभियंत्यांनी बोलून दाखविली.

बातम्या आणखी आहेत...