आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदयात्रा रवाना:धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नागपूरला पदयात्रा रवाना

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चराई क्षेत्र उपलब्ध करुन पासेस देण्यात याव्यात, धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा आदी मागण्यांसाठी नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय धनगर समाजाकडून घेण्यात आला आहे. सोमवारी पोस्टल ग्राउंडवरून जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी नागपूरकडे पदयात्रा सुरू केली.

धनगर मेंढपाळांना राज्यात कायमस्वरूपी चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे, मेंढपाळांना व मेंढ्यांना विमा सुरक्षा कवच देणे, धनगर मेंढपाळांना मारहाण करणाऱ्यांना कठोर कारवाईची तरतूद करण्यात यावी. धनगर मेंढपाळांना बाळू मामाच्या नावाने घरकुल योजना लागू करा, त्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अनुसूचित जमातीचा दाखला मिळावी, अशी मागणी सातत्‍याने होत आहे.

त्यासाठी मोर्चे आंदोलने करूनही सरकार योग्य प्रतिसाद देत नसल्याने धनगर समाजाने अखेरचा लढा धनगर आरक्षण’ हे ब्रीद घेवून यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा सोमवारपासून सुरू केली आहे. आरक्षणसाठी धनगर समाजाने एल्गार केला आहे. शहरातील पोस्टल ग्राउंडवरून पदयात्रा निघाली. १८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याचा निर्धार केला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अनुसूचित जमातीचा दाखला मिळावी, अशी मागणी सातत्‍याने होत आहे. धनगर समाज बांधव आपल्‍या मुलाबाळांसह, या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यँत आम्‍ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...