आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्यांना बक्षिस:राजस्थानी युवा गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा; सातशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

उमरखेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानी युवा गणेश मंडळ आणि मेटा रोल इस्पात प्रा. लि. च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त येथील राजस्थानी भवनात आयोजित चित्रकला आणि निबंध स्पर्धेत शहरातील सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सातशे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत प्रत्येक वयोगटात प्रथम बक्षिस सायकल, द्वितीय बक्षिस स्टडी टेबल आणि तृतीय बक्षिस स्कूल बॅग व शालेय साहित्य असे बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनात्मक बक्षिस त्यात भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह राजस्थानी युवा गणेश मंडळ आणि मेटा रोल इस्पात प्रा. लि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगवान अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून मांगीलाल जांगिड, विजय भुतडा, रवी शर्मा तर स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून वडे, दधेवार, राठोड, धोबे, वानखेडे, शितल बंग उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता रिया अग्रवाल, यशोदा अग्रवाल, तृप्ती शर्मा, निधी शर्मा, राधिका भराडे, कोमल बजाज यांनी परिश्रम घेतले. संतोष बंग, राहुल बंग, विशाल तेला, अजय वर्मा, पवन टवानी, चेतन अग्रवाल, शैलेश भंडारी, राहुल भट्टड, दत्तू लाल, व्यास, अनमोल अग्रवाल, दर्शन भंडारी, दिनेश भंडारी, रविराज अग्रवाल, किरण शिवाल, अर्चित शर्मा, आर्यन तिवारी व शुभम बंग यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन विशाल तेला तर प्रास्ताविक भूषण अग्रवाल यांनी केले. तर आभार गोकुळ भंडारी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...