आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोपडपट्टी भागातील रहिवासी असले तरी ते शहराचे सुद्धा सुजाण नागरिक आहे. याचा मात्र पालिकेला पूर्वीपासून विसर पडला आहे. त्यांनी पावसाळापूर्व मुरूम टाकणीला खो दिल्याने वेगवेगळ्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पूरसदृश्यस्थिती उद्भवू शकते, यावर तत्काळ उपाययोजना केली जावी, यासाठी गुरुदेव युवा संघाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून साकडे घातले.
दरवर्षी पावसाळापूर्व मुरूम टाकण्याकडे पालिका दुर्लक्ष करते. यंदा मात्र कर्तव्य कठोर मुख्याधिकारी यवतमाळ पालिकेला लाभल्याने त्यांच्याकडून वेळीच मुरुमाचा निविदा प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मोडणाऱ्या ओम नमो नगर, फुकटनगर, वाघाडी, वीटभट्टी परिसर, जनकनगरी, पाटीपुरा, तायडे नगर, पिंपळगाव, मोहा, टाकळी, बोदड, लोहारा आदी भागांमध्ये यंदा मुरुमाअभावी चिखल साचू शकतो. अति पर्जन्यमान झाल्यास येथील नागरिकांचे घरीसुद्धा वाहून जाण्याचा धोका आहे. तेव्हा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मडावी यांनी तत्काळ मुरूमची निविदा काढून या भागांमध्ये पाऊस बरसण्याच्या आधी मुरूम टाकावा, अशी मागणी गुरुदेव युवा संघाने वऱ्हाडे यांच्याकडे केली. यावर त्यांनी सदर प्रकरण नगर विकास अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. परंतु, या प्रक्रियेत कसूर केल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही गेडाम यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.