आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:पांढरकवडा बीडीओंची त्रीसदस्यीय समितीकडून होणार चौकशी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांढरकवडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या तक्रारींची त्री-सदस्यीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे. या समितीत ‘एसबीएम’च्या प्रमुख आणि दोन विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समितीला दिले आहे. गुरुवार, २२ डिसेंबर रोजी पंचायत समितीत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव यांच्या वागणुकीमुळे शिक्षकांसह ग्रामसेवक त्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी पदवीधर शिक्षक राजेंद्र राजदीप यांच्यासोबत त्यांनी हुज्जतबाजी केली. तर ग्रामसेवक संवर्गास हेतूपूरस्पर, विनाकारण त्रास देत असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती.

तक्रारीनंतरही कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना शोकॉज बजावून बुधवार, दि. १४ डिसेंबर रोजी सुनावणी हजर राहण्याच्या सुचना दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...