आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग:बापलेकाने जावयाच्या मदतीने केली विवाहित मुलीची हत्या, 72 तासांत प्रकरणाचा उलगडा

पांढरकवडा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशा प्रकारे हत्या करून ढकलले विहिरीत

पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील एका विहिरीत ११ एप्रिल रोजी विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ती आत्महत्या नसून ऑनर किलिंग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी २८ वर्षीय विवाहीत मुलीची बाप-लेकासह जावयाने हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे. रेखा राम शेडमाके (२८, रा. कारेगाव बंडल) असे मृत महिलेचे नाव आहे.

पेंढरी येथील रेखा हिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके यांच्या सोबत झाला होता. तिने हा विवाह कुटुंबीयांचा विरोध पत्कारून केला होता. काही दिवसापूर्वी रेखा माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवार दि. ११ एप्रिलला पेंढरी येथील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांकडून आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर तिला विहिरीत ढकलण्यात आल्याचे समोर आले. महिलेजवळ मिळालेल्या चिठ्ठीतील संशयित मुकेश उर्फ देवेंद्र कनाके याची देखील चौकशी करण्यात आली. मात्र, तपासात कुठलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. महिलेचा खून हा सामाजिक प्रतिष्ठा राखण्याकरिता झाला असावा, असा संशय पांढरकवडा पोलिसांना आला. पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

अशा प्रकारे हत्या करून ढकलले विहिरीत
सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी २८ वर्षीय विवाहित मुलीला दि. ९ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास पेंढरी शेत शिवारातील मक्याने केलेल्या शेतात वडील विलास मरापे, भाऊ हिरामण आणि जावाई सुभाष या तिघांनी पकडून आणले. त्यानंतर सोबत असलेल्या दोरीने मुलीचा गळा आवळून हत्या केली. तसेच तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खुनाची घटना घडलीच नाही, अशी नाट्यमय परिस्थिती निर्माण करून दोन दिवस आपले नियमित काम करत राहिले. परंतु पोलिसांनी कौशल्यपूर्ण रित्या तपास करीत ७२ तासातच संपूर्ण घटनेचा उलगडा केला.

बातम्या आणखी आहेत...